सोन्याचा दर पुन्हा उसळला, ग्राहकांच्या चिंतेत वाढ

सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ झाली असून आज २१ एप्रिल रोजी सोनं एक लाखांवर जाऊन पोहोचलं आहे. भारतात कमोडिटी एक्सचेंजनुसार गोल्ड फ्युचर्स सुरुवातीला ११९६ रुपयांनी म्हणजे १.२६ टक्क्यांनी उसळले आहे. त्यामुळं १० ग्रॅम सोन्याचा दर ९६,४५० रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर जीएसटीसह सोनं शुद्ध सोने जीएसटीसह १०१००० रुपये (एक लाख एक हजार रुपये) प्रति तोळावर पोहोचले आहे. सोन्याच्या दराने आज पुन्हा उच्चांक गाठला आहे. सोनं एक लाखाच्या पार गेल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

येत्या काही दिवसांतच अक्षय्यतृतीयेचा सण आहे. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभं मानलं जातं. मात्र त्याआधीच सोन्याने उच्चांकी दर गाठले आहेत. तसंच, एप्रिल-मे महिन्यापासून लग्नसराईला सुरूवात होते. ऐन मुहूर्तावरच सोनं महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात यूएस गोल्ड फ्यूचर्स २ टक्क्यांच्या तेजीसह ३,३९६ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आह. अमेरिकेच्या डॉलरमध्ये होत असलेली घसरण यामुळं दुसऱ्या चलनाद्वारे सोनं खरेदी करणं स्वस्त होतं. त्यामुळं डॉलरच्या घसरणीचा थेट फायदा सोन्याच्या किंमतीवर पडत असल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here