कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ( ईपीएफओ ) आपल्या ७.५ कोटी सदस्यांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’चा विस्तार करण्यासाठी अॅडव्हान्स क्लेम (एएसएसी) ची ऑटो सेटलमेंट मर्यादा सध्याच्या १ लाख रुपयांवरून पाच पट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (सीबीटी) च्या कार्यकारी समितीच्या (ईसी) ११३ व्या बैठकीत कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी ही मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यामुळे त्याच्या कोट्यवधी पीएफ धारकांना फायदा होणार आहे.