तमिळनाडूतील वलयापट्टी रेल्वे स्थानकाजवळ डिझेलने भरलेल्या मालगाडीला शनिवारी रात्री भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, आकाशात धुराचे लोट दिसू लागले. स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, आणि याबाबत तपास सुरू आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
चेन्नई बंदरातून डिझेल घेऊन जाणाऱ्या एका मालगाडीला रविवारी तिरुवल्लूरजवळ आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, ट्रेनचे चार डबे रुळावरून घसरले आणि त्याच वेळी आग लागली. घटनेनंतर लगेचच अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की ट्रेनमध्ये डिझेल भरले होते आणि आग लागलेल्या चार डब्यांना वेगळे करण्यासाठी उर्वरित ४८ डबे काढण्याचे काम वेगाने केले जात आहे. या अपघातामुळे चेन्नई-अरक्कोनम रेल्वे विभागातील गाड्यांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.