वारकऱ्यांसाठी सरकारने आनंदाची बातमी जाहीर केलीय. पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-2025 राबववण्यात येत आहे. वारीदरम्यान कुठल्याही कारणाने वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून चार लाखाची मदत मिळणार आहे.वारकऱ्यासंदर्भात सरकारकडून नवे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
जर वारीदरम्यान कुठलाही अपघात झाला आणि 60 टक्के होऊन अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाखाची मदत सरकार देणार आहे. 60% पेक्षा कमी अपंगत्व आल्यास सरकारकडनं 74 हजाराची मदत मिळणार आहे.