हरियाणा महापालिका निवडणूक निकालांमध्ये भाजपची सरशी

हरियाणातल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळाला आहे. या निवडणुकांमध्ये भाजपची ९ ठिकाणी सरशी झाली आहे. कुरुक्षेत्र, करनाल, फरिदाबाद, गुरुग्राम या ठिकाणच्या निवडणुकीत भाजपने विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. सात महापालिकांसाठी महापौर आणि प्रभाग सदस्य, चार नगर परिषदा आणि २१ पंचायत समितींसाठी अध्यक्ष तसंच सदस्य निवडीसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. सोहना, असंध आणि इस्माइलबाद या तीन ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक पार पडली.

हरियाणील महापालिका, नगरपालिका या निकालांमध्ये गुरुग्राम, करनाल, सिरसा या जिल्ह्यांचा समावेश आहे. हरियाणातील या निकालांमुळे विरोधी पक्षांचा सुपडा साफ झाला आहे अशी प्रतिक्रिया अनिल विज यांनी दिली आहे. काँग्रेसची आमदार आणि माजी रेसलर विनेश फोगाटच्या जुलाना या महापालिकेतही भाजपाचा विजय झाला आहे. फरिदाबाद येथील महापौर निवडणुकीत भाजपाच्या प्रवीण पत्रा जोशी यांनी ३ लाख १६ हजार ८५२ मतं मिळवत नवा विक्रम स्थापन केला आहे. हा विक्रम आधी भाजपाच्या उमेदवार सुनीता दयाळ यांच्या नावे होता. त्यांना २ लाख ८७ हजार मतं मिळाली होती.

छावणी नगरपरिषद निवडणुकीत ३५ पैकी ३२ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. अंबाला छावणी येथील जनतेने मला निकालांच्या रुपाने बक्षीसच दिलं आहे असं अनिल विज यांनी म्हटलं आहे. २ मार्चला या विविध जागांसाठीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. आज त्यांचे निकाल समोर आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here