मुंबईसह कोकणकिनारपट्टीवर पुढील काही तास अत्यंत धोक्याचे राहणार आहेत. मुंबई शहरात पुढील 3 ते 4 तासांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सोमवारी सायंकाळी 6:20 वाजता भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने ‘Nowcast Warning’ जारी केली असून, मुंबई शहरातील काही भागांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, पुढील दाेन दिवस अरबी समुद्रात उंचच उंच लाटा उसळणार असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.