पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या विरज्यामुळे हताश झालेल्या पतीचादेखील मृत्यू झाल्याची घटना सांगलीत घडली आहे. पत्नीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच पतीने प्राण सोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या आळसंसदमधील ही घटना आहे. पत्नीच्या मृत्यूच्या विरहाने पतीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सुनीता थोरात आणि धनाजी थोरात अशी पती-पत्नीची नावे आहेत.