बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘रेड 2’ हा चित्रपट एक महिन्यापूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. गेल्या एक महिन्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली पकड टिकवून आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात अजय देवगण सोबत इलियाना डिक्रूज देखील दिसली होती. यामध्ये तिने अभिनेत्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. मात्र, दुसऱ्या भागात इलियाना दिसली नाही. अशा परिस्थितीत आता अभिनेत्रीने खुलासा केला आहे की तिला ‘रेड 2’ मध्ये पुन्हा तीच भूमिका साकारण्याची ऑफर मिळाली होती. परंतु, अभिनेत्रीने ती ऑफर नाकारली.
याबाबत बोलताना इलियाना म्हणाली, की चित्रपटाच्या निर्मात्यांनी मला चित्रपटाची ऑफर दिली होती. पण दुर्दैवाने आम्ही शूटिंगची वेळ निश्चित करू शकलो नाही. कारण त्यावेळी मी माझ्या मुलाला जन्म दिला होता आणि यावेळी माझ्या जबाबदाऱ्या पूर्णपणे वाढल्या होत्या. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाकडे आणि मुलाकडे पूर्ण लक्ष देत होते. त्यामुळे ती माझ्या करिअरकडे जास्त लक्ष देऊ शकले नाही.








