31 दिवसांच्या ऑगस्ट महिन्यात जवळपास 15 दिवस सुट्ट्या असणार आहे. जर तुम्हाला बँकांची (Bank) कामं करायची असेल तर लगेचच करुन घ्या, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. ऑगस्ट 2025 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे:
3 ऑगस्ट (रविवार): देशभरात बँका बंद. त्रिपुरामध्ये केर पूजेसाठीही सुट्टी असेल.
8 ऑगस्ट (गुरुवार): तेंदोंग लो रम फाटमुळे सिक्कीम आणि ओडिशामध्ये बँका बंद राहतील.
9 ऑगस्ट (शुक्रवार): उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये रक्षाबंधनाची सुट्टी असेल.
10 ऑगस्ट (दुसरा शनिवार): देशभरात बँका बंद राहतील.
13 ऑगस्ट (मंगळवार): देशभक्ती दिनानिमित्त मणिपूरमध्ये बँका बंद राहतील.
15 ऑगस्ट (शुक्रवार): देशभरात स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असेल.
16 ऑगस्ट (शनिवार): जन्माष्टमी आणि पारशी नववर्षानिमित्त गुजरात आणि महाराष्ट्रात बँका बंद राहतील.
17 ऑगस्ट (रविवार): देशभरात बँका बंद राहतील.
23 ऑगस्ट (चौथा शनिवार): देशभरात बँका बंद राहतील.24 ऑगस्ट (रविवार): देशभरात बँका बंद राहतील.
26 ऑगस्ट (सोमवार): कर्नाटक आणि केरळमध्ये गणेश चतुर्थीला सुट्टी असेल.
27 ऑगस्ट (मंगळवार): आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा, सिक्कीम, तामिळनाडू आणि तेलंगणा येथे गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस साजरा केला जाईल.
28 ऑगस्ट (बुधवार): ओडिशा, पंजाब आणि सिक्कीममध्ये नुआखाईनिमित्त सुट्टी असेल.
31 ऑगस्ट (रविवार): देशभरात बँका बंद राहतील.या सर्व सुट्ट्या मिळून, अनेक राज्यांमध्ये बँका अर्धा महिना किंवा त्याहून अधिक दिवस बंद राहू शकतात.