देशात लवकरच धावणार हायड्रोजन ट्रेन! ट्रायल सुरू

आपल्या देशात लवकरच हायड्रोजनवर चालणारी ट्रेन धावणार आहे. या ट्रेनचं ट्रायल सुरू झालं आहे. ही ट्रेन हरियाणातील जींद आणि सोनीपत मार्गावर धावणार आहे.हायड्रोजन ट्रेन इतर ट्रेनपेक्षा वेगळी आहे. ही ट्रेन सर्वात पर्यावरणपूरक (Environment Friendly) आहे. ही ट्रेन चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये बनवली आहे.८९ किलोमीटरच्या या मार्गावर ट्रेनचं ट्रायल सुरू झाले आहे.

ही ट्रेन ताशी ११० किलोमीटर वेगाने धावू शकते. या ट्रेनमध्ये १२०० हॉर्सपॉवरची क्षमता आहे. एका वेळी २६३८ प्रवासी प्रवास करू शकतात. रेल्वे मंत्रालयाने हायड्रोजन इंधन सेलवर आधारित ट्रेन बनवण्यासाठी २८०० कोटी रुपये दिले आहेत. त्यातून ३५ ट्रेन्स बनवल्या जाणार आहेत. ८ डब्यांची ही ट्रेन ताशी ११० किलोमीटर वेगाने धावणारी जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेनपैकी एक असेल.पर्यावरणपूरक असणारी ही ट्रेन कार्बन उत्सर्जन कमी करणार आहे. हायड्रोजन हा एक स्वच्छ आणि पुनर्वापरित ऊर्जा स्रोत आहे. डिझेल आणि इलेक्ट्रिक ट्रेनपेक्षा ही ट्रेन अधिक फायदेशीर ठरेल. हायड्रोजन ट्रेनमध्ये हायड्रोजन इंधन सेल असतो, जो हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या अभिक्रियेतून वीज निर्माण करत असतो. या प्रक्रियेत पाणी (H₂O) आणि ऊर्जा निर्माण होते. यामुळे ही ट्रेन पर्यावरणासाठी पुरक ठरणार आहे. प्रदूषणमुक्त ट्रेन असणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यावर ही ट्रेन नियमितपणे लोकांसाठी सुरू केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here