बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी भारत आशिया कपमध्ये खेळणार नाही हा दावा फेटाळून लावला आहे. याबाबत खुलासा करत ते म्हणाले की, ” ही बातमी पूर्णपणे खोटी आहे आणि आशिया कपमध्ये सहभागी होण्याबाबत कोणतीही बैठकही झालेली नाही.”
ते पुढे म्हणाले की, “आज सकाळपासून अशी बातमी समोर येत आहे की BCCI ने पुरुष आशिया कप आणि महिला इमर्जिंग टीम्स एशिया कपसाठी भारतीय संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही स्पर्धा Asian Cricket Council (ACC) अंतर्गत येतात. मात्र, आम्ही स्पष्ट करू इच्छितो की या बातम्यांमध्ये कोणतीही तथ्य नाही.आशिया कपमध्ये सहभागी व्हायचं की नाही, यासंदर्भात अद्याप कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याचाही प्रश्नच उद्भवत नाही.”