तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेचे पाऊल!

रेल्वेने तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. सकाळी 10.00 ते 10.30 वाजेपर्यंत एसी क्लास बुकिंगसाठी तसेच नॉन-एसी क्लासेसच्या बुकिंगसाठी, सकाळी11 ते 11.30 ही वेळ निश्चित केली आहे. या 30 मिनिटांच्या दरम्यान कोणतेही अनरजिस्टर एजेंट बुकिंग करु शकणार नाहीत. हा वेळ फक्त सामान्य प्रवाशांसाठी असून सामान्य प्रवाशीच तिकीट बुक करू शकणार आहेत.

त्याचबरोबर आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे, तात्काळ तिकीट बुकिंग करण्यासाठीही ओटीपी व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आलं आहे. म्हणजेच प्रवाशी तिकीट बुक तेव्हाच करू शकता जेव्हा आयआरसीटीसी प्रोफाइल आधार कार्डशी जोडलेले असायला हवे आणि मोबाईलवर आलेल्या ओटीपीची पुष्टी होणे गरजेचे आहे.

जम्मू विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, उचित सिंघल म्हणाले की, आता ओटीपी पडताळणीशिवाय तत्काळ तिकीट बुकिंग शक्य होणार नाही. प्रवाशांना त्यांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला आहे आणि आयआरसीटीसी प्रोफाइलमध्ये अपडेट केलेला आहे याची खात्री करावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here