दहशतवाद्यांशी संबंध, तीन सरकारी कर्मचारी बडतर्फ

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी एक मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून तीन सरकारी कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एक पोलीस हवालदार, एक वन विभागाचा कर्मचारी आणि एका शिक्षकाचा समावेश असल्याचे समजत आहे. तीन कर्मचाऱ्यांपैकी एकाचं नाव फिरदौस अहमद भट असं असल्याची माहिती समोर आली आहे. तो सेवेत असताना एका दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचा आरोप आहे.

दरम्यान आज लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मनोज सिन्हा यांनी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना दहशतवादविरोधी कारवाया आणखी तीव्र करण्याचे आदेश देखील दिले. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याबद्दल ७० हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here