ज्योती अशी राहायची पाकिस्तानच्या संपर्कात! वापरायची ‘हे’ दोन प्रसिद्ध ॲप

हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणा पोलिसांनी युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केली. भारताच्या लष्करी ऑपरेशन ऑपरेशन सिंदूरसह लष्कराशी संबंधित अनेक गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप तिच्यावर आहे. ज्योती मल्होत्रा २०२३ चा व्हिसा मिळविण्यासाठी एका एजंटची मदत घेऊन पाकिस्तानला गेली. या भेटीदरम्यान तिची भेट नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली. १३ मे २०२५ रोजी दानिशला पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आणि भारतातून हद्दपार करण्यात आले. रहीमच्या मदतीने ज्योती दोनदा पाकिस्तानला गेली आणि रहीमचा सहकारी अली एहवानशी तिची ओळख झाली. ज्योतीचा पाकिस्तानमधील राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च त्यानेच केला.

दानिशने ज्योतीची ओळख अनेक पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी म्हणजेच पाकिस्तान इंटेल ऑपरेटिव्ह-पीआयओ यांच्याशी करुन दिली होती. भारतीय ठिकाणांबद्दलची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आणि सोशल मीडियावर पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा निर्माण केल्याचा ज्योतीवर आरोप आहे. ज्योतीचे एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याशी जवळचे संबंध होते आणि ती त्याच्यासोबत इंडोनेशियातील बाली येथेही गेली होती, असेही तपासात पुढे आले आहे. पहलगाममधील भयानक हत्याकांडानंतर जेव्हा भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले तेव्हा ज्योती तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ‘युद्धाला नकार द्या’ असे संदेश पोस्ट करत होती. एवढेच नव्हे तर आपल्या हालचालींवर संशय येऊ नये म्हणून तिने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि दानिशशी बोलण्यासाठी स्नॅपचॅट आणि टेलिग्रामचा वापर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here