स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकलं तरी अंगात एक वेगळ बळ संचारत. स्फुरण चढत. स्वराज्यासाठी त्यांनी 40 दिवस दिलेली झुंज आठवते.. आणि डोळ्यात पाणी तरळत.. छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर पाय रोऊन उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेतली.
मराठा साम्राज्याच्या १५ पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एकहाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण 140 युद्धे लढली. महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना एकही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. छत्रपती संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. आणि हे त्या पाताळयंत्री क्रूर मुघल साम्राज्याचा बादशहा औरंगजेब यालाही माहित होतं.. मुघलांची लाखोंची सेना, लांबून पाहिली तरी धडकी भरवणाऱ्या सेनेला छत्रपती संभाजी महाराजांनी जेरीस आणलं.. हे त्या औरंग्याने पण मान्य केलं होतं.. लढाई करून आपण शंभू महाराजांना हरवू शकत नाही म्हणूनच फितुरी, गद्दाराच्या मार्गाने त्याने आपल्या शंभू राजांना कैद केलं.

छत्रपती संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, कुशल संघटक, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांचा नावलौकिक होता..कितीही विशेषण लावली तरी कमी पडतील.
छावा चित्रपटाच्या निमित्ताने त्याचं असामान्य कर्तृत्व, शौर्य पुन्हा एकदा समोर आलं आहे.. धर्मांतरणाचे आमिष नाकारल्याने छत्रपती संभाजी महाराजांची दुर्दैवी हत्या औरंगजेबाने केली, हाच खरा इतिहास आहे. पण चित्रपट रिलीज होण्याआधी महाराज लेझीम खेळले म्हणून काही लोकांनी विनाकारण वाद निर्माण केला.. आणि या चित्रपटाला वादात अडकवण्याचा प्रयत्न केला.. पण यावर ही मात करून चित्रपटाला मोठं यश मिळतंय. अहो आपल्या राजाचं शौर्यच तसं आहे..
पण छावा चित्रपटाने मतांसाठी जे बाटलेले आहेत त्यांची जरा धावपळ सुरू झाली.. पुन्हा एकदा चुकीचा खोटा इतिहास पसरवायला हे सज्ज झाले आहेत.. छत्रपती संभाजी महाराजांच्या ऑनलाइन बदनामीचा डाव आखण्यात आलाय.. वादग्रस्त भोजपुरी अभिनेत्री अभिनेता कमाल खान न गरळ ओकली.. या स्वयंघोषित चित्रपट समीक्षकाने छावा चित्रपटाचं समीक्षण केलं..आणि विकिपीडियावरचा एक चुकीचा मजकूर पोस्ट केला. हा मजकूर आता हटवण्यात आलाय पण त्याचा आशय असा होता की.

छत्रपती संभाजी महाराजांना शिवरायांनीच अटकेत ठेवलं होत.. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते.. छत्रपती संभाजी महाराजांचे मुघलांशी संबंध असल्याचा दावा केला होता..
छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना उत्तराधिकारी बनवणार नव्हते.
विकिपीडियाचा मजकूर म्हणजे कोणीतरी हा टाकला होता. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं आणि हा मजकूर हटवण्याचे आदेश दिले. याचा अर्थ छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर, त्यांच्या दैदिप्यमान इतिहासावर कलंक लावण्याचं काम काही समाज कंटक आजही करतायत, हे दुर्दैव आहे.
कधी कधी वाटतं आपल्याला शाळा कॉलेज मध्ये जो इतिहास शिकवतात तोच चुकीचा आहे.. कुठल्या तरी इटूकल्या पिटुकल्या देशातल्या लढाया, क्रांत्या शिकवण्यापेक्षा महाराजांचा संपूर्ण इतिहास शिकवा.. आज तो शिकवला असता ना तर चित्र वेगळं असतं… पण छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले सुपुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज एवढंच आपल्याला शिकवलं जातं…त्याचं असामान्य शौर्य, त्याग, बलिदान कुठे आहे. प्रेमाच प्रतीक म्हणून शाहजहान ने मुमताज साठी बांधलेला ताजमहाल आपल्याला सांगितला जातो..पण स्वतःच्या बायकोला म्हणजे महाराणी येसूबाईंना “स्त्री सखी राज्ञी जयती” असा ‘किताब देऊन तत्कालीन पुरुषप्रधान संस्कृतीला उघड आव्हान देत स्त्री पुरुष समानतेचं मूळ धरून मुलखीं कारभार सोपवणारा द्रष्टा सुधारक कधी सांगितलाच नाही आम्हाला. कारण आपल्याकडे आपल्या राजांपेक्षा मुघल, औरंगजेब यांना महत्त्व दिलं.. त्यांनी कसा स्वराज्याला त्रास दिला हे शिकवलं जातं.. पण आपले राजे कसे लढले, वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत पंडित ठरलेला, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्या औरंग्याला जेरीस आणणारा, दुष्काळाने पीडित रयतेला शेतसारा माफ करून सरकारातून पैसे आणि बी-बियाणं पुरवून शेतीला आणि शेतकऱ्याला आधार देणारा जाणता राजा, वडिलांच्या स्वराज्यमंदिरावर स्वतःच्या प्राणांची आहुती देत कळस चढवणारा, रयतेला छळणाऱ्या सिद्धीला समुद्रात बुडवायचा चंग बांधून ८०० मीटर लांबीचा समुद्रात भराव टाकून पूल बांधणारा इंजिनियर आपले छत्रपती संभाजी महाराज कधी सांगितलेच नाही.

हे शिकवलं असत, सांगितलं असतं तर आज एवढ अज्ञान नसतं..आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खोटा इतिहास पसरवण्याची कोणाची हिंमत झाली नसती.. क्रिकेटर आकाश चोप्रा यांनी सुद्धा शाळेत छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल का शिकवलं नाही?” असा सवाल उपस्थित केला..
आता तरी योग्य, खरा इतिहास शाळे पासूनच शिकवला जावा..ही अपेक्षा आहे..आणि त्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्याची गरज आहे..
छावा सिनेमातील चटका लावून जाणारा प्रसंग म्हणजे औरंगजेबाची धर्मांतरणाची मागणी धुडकावून स्वराज्यासाठी मृत्यूला सामोरे जाणारे छत्रपती संभाजी महाराज… हाच या चित्रपटाचा परमोच्च बिंदू आहे.. औरंगजेब शंभूराजांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकतो..छत्रपती संभाजी महाराज म्हणतात आमच्याकडे ये, मराठ्यांशी हातमिळवणी कर.. धर्म सुद्धा बदलावा लागणार नाही. हा आहे आपला हिंदू धर्म, हे आहे खरं हिंदुत्व.
आज छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे आपण हिंदू म्हणून अभिमानाने मिरवतो.. पण आज अनेक जण त्यांचा खोटा इतिहास मांडण्यात धन्यता मानतात..
आज ही ख्रिश्चन आणि इस्लामिक आक्रमण आपल्यावर होतायत.. काहींना फूस लावून, पैशाचं आमिष दाखवून धर्मांतरण केलं जातं.. पण पैशांसाठी दुसरा धर्म स्वीकारताना आपल्या शंभू राजाचं बलिदान आठवा.. त्यांचे ते 40 दिवस आठवा.. मग पाऊल उचला.. हिंदू मुलींनो प्रेमाच्या नादात लव्ह जिहाद मध्ये अडकून स्वतःच हिंदुत्व विसरू नका.. आपण निर्भय पणे जगावं यासाठी आपल्या राजाने बलिदान दिलं हे विसरू नका..
सोडावा धर्म की सोडावा प्राण , ऐसा प्रश्न कधी न पडावा
सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा, शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा!