करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूरचं निधन

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूरचं वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झालं आहे. गुरुवारी युकेमध्ये पोलो खेळत असताना संजय कपूरला ह्रदयविकाराचा झटका आला आणि जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान संजय कपूरने तीन दिवसांपूर्वी केलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट वाचल्यानंतर संजय कपूरला आधीच आपल्या मृत्यूची कल्पना आली होती का अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

संजय कपूर याने तीन दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली होती. याच्या कॅप्शनला त्याने लिहिलं होतं की, “प्रगतीसाठी धाडसी निर्णय गरजेचे असतात, योग्य स्थिती नाही”. दरम्यान पोस्टमध्ये त्याने लिहिलं होतं की, “तुमचा पृथ्वीवरचा काळ मर्यादित आहे”. या वाक्याचा संबंध काहीजण त्याच्या मृत्यूशी जोडत आहेत आणि सांगत आहेत की, संजय कपूरला आधीच त्याच्या मृत्यूची कल्पना आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here