भारतीय क्रिकेटर के एल राहुल (KL Rahul) आणि आथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या घरी मार्चमध्ये पाळना हलला आहे. शुक्रवारी दोघांनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. तसंच यावेळी त्यांनी आपल्या मुलीच्या नावाचीही घोषणा केला आहे. अथिया आणि राहुलने फोटोमध्ये त्यांच्या बाळाचा चेहरा उघड केलेला नाही.
फोटोमध्ये के एल राहुल आणि आथिया आपल्या बाळासह दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “आमची मुलगी, आमचे सर्व काही. Evaarah / इवारा – देवाची भेट”. इवारा हा शब्द संस्कृतमधून आला असून याचा अर्थ देवाची भेट असा आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा, समांथा रुथ प्रभू यांनी कमेंटमध्ये हार्ट इमोजी शेअर केली आहे.