कोकण रेल्वेने 23 ऑगस्टपासून रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोवा राज्यातील वेर्णा दरम्यान कार ऑन ट्रेन ही सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळं नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्यामुळं अनेकांसाठी हा दिलासादायक निर्णय वाटला होता. मात्र रेल्वेची ही सेवा फक्त गोव्यापर्यंतच आहे. कारण रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत कोणताही पिकअप पॉइंट नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार नाही.
दरम्यान, रेल्वेतून एकावेळी 40 कार घेऊन जाता येणार आहेत. मात्र आत्तापर्यंत फक्त एकच बुकिंग झाली आहे. तर, रविवारी 38 जणांनी चौकशीसाठी संपर्क साधला होता. 13 ऑगस्टपर्यंत कमीत कमी 13 बुकिंग आल्या नाही तर ट्रेन रद्द करण्यात येईल. तसंच, प्रवाशांना त्यांचा रिफंड देण्यात येईल.