स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रलंबित निवडणूका ४ महिन्याच्या आत होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला यासंदर्भात निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ठराविक वेळेत घ्या, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलंय. उर्वरित वादाचे मुद्दे टाळण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत.
निवडणुका कालबद्ध पद्धतीने घ्याव्यात. मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जाणार असल्याने आवश्यकता भासल्यास मुदतवाढ मागता येईल, असेही निर्देशात म्हटलंय.