पंढरपूरला जाणाऱ्या कुटुंबाची लूटमार आणि मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना रात्री उशिरा रस्त्यात अडवून लुटल्याची घटना समोर आली होती. तसेच त्यांच्यासोबतच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना पकडलं असल्याची माहिती समोर आली आहे. मागील दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस या नराधमांचा शोध घेत होते.

पुणे पोलिसांना या प्रकरणात दोघांना पकडण्यात यश मिळालं आहे. अमीर पठाण आणि विकास सातपुते अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here