लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपट आला आणि इतिहासाची एक जाणूनबुजून झाकलेली बाजू पुन्हा एकदा समोर आली. विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या दमदार भूमिकेची जोरदार चर्चा आहे. छत्रपती संभाजी महाराजांच बलिदान, त्याचं शौर्य समोर आलं. या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे.. खुद्द पंतप्रधान मोदी यांनीही या चित्रपटाच साहित्य संमेलनाच्या मंचावरून कौतुक केलं.
यावरून अनेक वाद पण सुरू आहेत. शिर्के घराण्याचा चुकीचा इतिहास दाखवला असं त्यांच्या वंशजाचं म्हणणं आहे. काही इतिहास अभ्यासकांनी यात उडी घेतली. मग धमकी प्रकरण रंगल. विधानसभेत ही याचे पडसाद उमटले. इतकचं नाही तर काही औरंगजेब प्रेमी लोकांनी औरंगजेबाची तळी उचलली. अबू आझमी यांच्या वक्तव्याचे चांगलेच पडसाद उमटले.. अधिवेशनात त्याचं निलंबन करण्यात आलं. उत्तर प्रदेश विधानसभेत ही त्यांची वक्तव्याची चर्चा झाली. एकीकडे हा वाद सुरू असताना मध्यप्रदेशात मात्र या चित्रपटाचा वेगळाच परिणाम पाहायला मिळाला.. मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरच्या असिरगड गावात नक्की चाललंय काय? डोक्यावर टॉर्च असलेली टोपी, जमीन खोदणारा जमाव आणि चाळणीतून माती गाळली जात आहे. बुऱ्हाणपूरमध्ये काय चाललंय? हे लोक काय शोधत आहेत? याचं उत्तर आहे सोन्याची नाणी. तिथले अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
छावा सिनेमात मुघलांनी मराठ्यांकडून सोने आणि खजिना लुटला आणि तो मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील असीरगढ किल्ल्यात ठेवला, असं दाखवण्यात आलं आहे. छावा सिनेमा पाहिल्यानंतर खजिना शोधण्यासाठी आणि घरी नेण्यासाठी स्थानिक लोकांनी रस्तेच्या रस्ते खणले आहेत. धातू शोधक आणि पिशव्या घेऊन लोक घटनास्थळी गर्दी करू लागले.
या गोष्टीसाठी केवळ छावा सिनेमा कारणीभूत नसून, असीरगडमध्ये महामार्ग बांधणीचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी, येथील शेतात काम करणाऱ्या काही कामगारांनी मातीत सोन्याचे नाणे सापडल्याचा दावा केला होता. यानंतर अफवा पसरली की येथे सोन्याचे नाणे पुरले आहेत. हे कळल्यानंतर 50 पेक्षा जास्त गावांतील लोकांनी शेतावर हल्ला केला. आता दररोज रात्र पडताच सोन्याच्या शोधात लोकांची गर्दी येथे पोहोचते. एवढेच नाही तर हे लोक त्यांच्यासोबत मेटल डिटेक्टर देखील आणतात. मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर… जे एकेकाळी मुघल सैनिकांचे छावणी होते. जेव्हा सैनिक युद्धावरून परत येत असत तेव्हा ते लुटलेला खजिना येथे जमिनीत खड्डा खोदून गाडत असत. असा दावा केला जात आहे की लोकांना याआधीही येथील मातीत सोन्याचे नाणी सापडले आहेत. आता पुन्हा एकदा मातीत गाडलेल्या खजिन्याचा शोध घेण्यासाठी दूरदूरचे लोक रात्रीच्या अंधारात बुऱ्हाणपूरला पोहोचत आहेत.
छावा चित्रपटात बुऱ्हाणपूरचे वर्णन सोन्याची खाण म्हणूनही करण्यात आले आहे. चित्रपटात दाखवण्यात आले आहे की औरंगजेबाच्या बुऱ्हाणगड किल्ल्यात एक प्रचंड खजिना होता. युद्धात लुटलेले सोने, चांदी, हिरे आणि दागिने त्याने येथे ठेवले. जेव्हा संभाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण सैन्यासह बुऱ्हाणपूर किल्ल्यावर हल्ला केला आणि बहादूर खानच्या सैन्याचा पराभव केला आणि तेथून सर्व खजिना लुटला आणि तो आपल्यासोबत मराठा साम्राज्यात घेऊन गेले. असे मानले जाते की या चित्रपटापासून प्रेरित होऊन, लोक आता बुऱ्हाणपूरमध्ये पुरलेल्या सोन्याच्या नाण्यांचा शोध घेत आहेत.
आपल्याकडे एखादी अफवा पसरली की त्याची शहानिशा न करता आपण कसे एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो याच हे उदाहरण आहे. म्हणजे पुरातत्व खात्याला उत्खननात एखाद्या भागात जुने अवशेष सापडतात हे बरोबर आहे. पण अशा पद्धतीने जर रोज रात्री मुघलांच्या काळातला सोन्याचा खजिना कितीही शोधला तरी तो मिळणार नाही.. चित्रपट या माध्यमाचा समाजमनावर कसा परिणाम होतो याचं हे उदाहरण आहे.