छत्रपती शिवाजी महाराजांच्या यंतीनिमित्त राष्ट्रीय नेत्यांनाही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोकसभेतील विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे आमदार राहुल गांधींनीही आपआपल्या एक्स अकाऊंटवरुन शिवजयंतीसंदर्भात पोस्ट केली आहे. मात्र राहुल गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये वापरलेल्या एका शब्दावरुन नवीन वाद उफाळला आहे.
राहुल गांधींनी आपला एक जुना फोटो पोस्ट करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्यात. या फोटोमध्ये राहुल गांधी शिवरायांची पूर्णकृती मूर्ती हातात धरुन उंचावून दाखवताना दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करताना राहुल गांधींनी, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो आणि मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपलं शौर्य आणि साहसाने त्यांनी आपल्याला निर्भिडपणा आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचं आयुष्य आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणास्रोत राहील, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे,” अशी कॅप्शन दिली आहे.
मात्र शिवरायांच्या जन्मदिनी त्यांना ‘श्रद्धांजली अर्पण करतो’ असा उल्लेख या पोस्टमध्ये असल्याने अनेकांनी आक्षेप घेतला आहे. सामान्यपणे जयंतीनिमित्त केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये आदरांजली असा उल्लेख करतात. श्रद्धांजली हा शब्द पुण्यतिथीच्या संदर्भातून वापरला जातो. असं असताना राहुल गांधींनी जयंतीच्या दिवशी हा शब्द पोस्टमध्ये वापरल्यावरुन आक्षेप घेतला जातोय. तशा कमेंट या पोस्टखाली पाहायला मिळत आहेत.
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2025
अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी।
उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा। pic.twitter.com/1jOCYOkrC1