पुन्हा होणार कॉमेडीचा धमाका..अंकुश चौधरी घेऊन येत आहे ‘नो एंट्री पुढे धोका आहे 2 – कॉमेडी ॲाफ टेरर्स’

13 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटातील कलाकारांची धमाल आणि ‘जपून जपून जा रे’ या गाण्याने तर अवघ्या प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्याची मागणी प्रेक्षकांनी केली होती. आता लवकरच सर्वांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी याने स्वतः ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ – कॉमेडी ऑफ टेरर्स’ ची सोशल मीडियावर घोषणा केली आहे.

सध्या बॅालिवूड, हॅालिवूड, टॅालिवूडमध्ये फ्रेंचाइजीचा ट्रेंड असून मराठीतही हा ट्रेंड रूजू लागला आहे. प्रेक्षकांना असे चित्रपट आवडतात. म्हणूनच ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ – कॅामेडी ॲाफ टेरर्स ’ डबल धमाल घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

निखिल सैनी फिल्म्स अँड एंटर टेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी करणार आहे. पोस्टरमध्ये स्टायलिश लूकमधील अंकुश चौधरी दिसत असून त्याच्या बाजूला दोन मुली दिसत आहेत. ज्या अर्ध्या मुलीच्या रूपात आहेत तर अर्ध्या रोबोटच्या रूपात आहेत. त्यामुळे यात आधुनिक तंत्रज्ञानाची जादू पाहायला मिळणार हे नक्की! कॉमेडी जॉनर असलेल्या या चित्रपटाला नकाश अजीज आणि सरगम जस्सू यांचे संगीत लाभले आहे. सध्यातरी या चित्रपटात कोण कलाकार असतील, हे गुलदस्त्यात असले तरी हा चित्रपटही बॉक्स ऑफिस गाजवणार.

चित्रपटाचे निर्माते निखिल सैनी म्हणाले, ‘’ आज अंकुश चौधरीचा वाढदिवस आहे. या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस कोणता असूच शकत नाही. चित्रपटाची टीम इतकी कमाल आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा भाग होताना आम्हाला निश्चितच आनंद होत आहे. प्रेक्षकांसह आम्हीसुद्धा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत.’’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here