पनवेल ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी 5 ऑगस्ट मंगळवार ते 8 ऑगस्ट शुक्रवार दरम्यान दररोज रात्री 10.45 ते पहाटे 3.45 या वेळेत अप व डाउन मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणारं आहे. या कालावधीत वाशी ते पनवेलदरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.

ब्लॉकदरम्यान काही लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. काही गाड्या ठरावीक स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. बेलापूरहून रात्री 8.54 वाजता सुटणारी बेलापूर-सीएसएमटी लोकल वाशीपर्यंतच धावेल, तर रात्री 9.16ची बेलापूर-सीएसएमटी लोकल वडाळा रोडपर्यंतच धावणार आहे. वांद्रे-सीएसएमटी लोकल रात्री 10 वाजता सुरू होऊन वडाळा रोडवरच थांबवण्यात येणार आहे. पनवेलहून रात्री 10.55 आणि 11.32 वाजता सुटणाऱ्या पनवेल-वाशी लोकल सेवा नेरूळपर्यंतच चालविण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here