मनसे नेते संदीप देशपांडे यांचे नेतृत्वाखाली हिंदी सक्तीच्या विरोधात स्वाक्षरी मोहिम घेण्यात आली आहे. दादरच्या आयईएस शाळेच्या बाहेर हिंदी सक्तीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. आम्ही सरळ मार्गाने आंदोलन करत आहोत तोपर्यत सरकारने तोपर्यंत दखल घ्यावी. उद्या महाराष्ट्रभर थैमान घालायला लावू नये अन्यथा जबाबदारी सरकारची असेल, असे यावेळी संदीप देशपांडे म्हणाले.
सह्यांच्या या मोहिमेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळतोय. महाराष्ट्रात २ भाषा शिकवल्या जातील, तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रात पहिलीपासून नको. बैठकीमध्ये त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा. सध्या सकारात्मक तसा जोर भरपूर आहे. सरकारने सक्तीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा उद्याचा रस्त्यावर आम्ही तांडव मांडायला लागलो तर मराठी माणसाला आणि महाराष्ट्र सैनिकांना आवरण सरकारला कठीण होत असेल असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. लोकांची संभ्रमावस्था दूर करणं हे सरकारच कर्तव्य आहे. त्यांनी ते केला पाहिजे. तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार असल्याचेही देशपांडे म्हणाले.