होळीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात मशिदी ताडपत्रीने झाकल्या जाणार

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यानाथ यांच्या सरकारने रंगपंचमी निमित्ताने उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यात रंगपंचमीच्या दिवशी मशिदी ताडपत्रीने झाकण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलिसांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

संभलमधील मुस्लिम समुदायाने रंगपंचमीच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गात येणाऱ्या सुमारे १० मशिदींना ताडपत्रीने झाकण्याचा निर्णय घेतला आहे. संभलचे वरिष्ठ पोलीस आयुक्त म्हणाले की, धार्मिक स्थळांचे संरक्षण परस्पर संमतीने केले जाईल. हिंदू समुदायाने दुपारी २.३० वाजेपर्यंत रंगपंचमी खेळावी. त्यानंतर मुस्लिम लोक नमाज पठण करतील. दरम्यान रंगपंचमीच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या चौपैय्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ताडपत्रींनी झाकण्यात येणाऱ्या या मशिदींमध्ये शाही जामा मशीदीचा देखील समावेश आहे. तसेच, शाहजहांपूरमध्ये होळीच्या दिवशी लाट साहेबांची मिरवणूक काढली जाते आणि त्यासाठी शहरातील सुमारे ६७ मशिदी आणि दर्ग्यांना ताडपत्रीने झाकण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक म्हणाले की, शहरातून निघणाऱ्या पारंपारिक लाट साहेब मिरवणुकीच्या १० किमी मार्गात असलेल्या सर्व मशिदी आणि दर्ग्यांवर रंग पडू नयेत म्हणून त्यांना काळ्या फॉइल आणि ताडपत्रीने झाकण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here