शेअर बाजारात घसरण सुरुच, वाचा सविस्तर नेमकी काय स्थिती?

भारतीय शेअर बाजारात गेल्या आठ दिवसांपासून सतत घसरण सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परस्पर शुल्क धोरणाबद्दलची चिंता आणि परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून बाहेर पडत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकारात्म पातळीवर उघडलेले सेन्सेक्स आणि निफ्टी काही वेळातच घसरले आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये सुमारे ६०० अंकांची तर निफ्टी ५० मध्ये सुमारे २५० अंकांची घसरण झाली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह सर्व देशांवर ‘परस्पर कर’ कर लादण्याच्या त्यांच्या धोरणाचा पुनरुच्चार केला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय शेअर बाजारात विक्रीचा जोर सुरू ठेवला आहे. त्यांनी या महिन्यात आतापर्यंत सुमारे १९,०७७ कोटी रुपये काढून घेतले आहेत. जानेवारीच्या सुरुवातीलाही त्यांनी भारतीय बाजारातून ७८,०२७ कोटी रुपये काढून घेतले होते. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय चलनातील सततची कमजोरी आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे परकीय चलन बाहेर पडण्यास चालना मिळाली आहे. गुरुवारीही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २,७८९.९१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here