भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषेबाबत वादग्रस्त विधान केले ज्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला. मुंबईत हिंदी भाषिकांना मारणाऱ्यांनी हिम्मत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवावे. आपल्या घरात कुत्राही वाघ असतो, असे ते म्हणाले. एवढच्यावरच न थांबता त्यांनी तुम्ही कोणाची भाकर खाता? टाटा, बिर्ला, रिलायन्सची युनिट्स महाराष्ट्रात नाहीत. महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतो, असेही त्यांनी म्हटले.
आता निशिकांत दुबे यांनी आणखी महत्वाचे विधान केलंय. मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेचा सन्मान आहे. तसा कन्नड, तामिळ, तेलगु यांना त्यांच्या भाषेचा सन्मान आहे. जसं त्यांना आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे, तसे बिहार, झारखंड मध्य प्रदेशच्या लोकांनाही त्यांच्या हिंदी भाषेबद्दल प्रेम आहे. त्यांना ठाकरे परिवार मारहाण करत असेल तर सहन करण्याच्या पलिकडे असल्याचे निशिकांत दुबे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, माझी आणखी एक बाब तोडून मोडून सांगण्यात आली. महाराष्ट्राचे देशाचे इकोनॉमीमध्ये मोठं योगदान आहे. माझं म्हणणं लोकांनी चुकीच्या पद्धतीने घेतलं. हे कोणीच अमान्य करणार नाही. महाराष्ट्र टॅक्स देतोय, त्या पैशात आमचं देखील योगदान आहे. याचं ठाकरे घराण्याशी काही देणंघेणं नाही. याचं मराठ्यांशी देणंघेणं नाही. तुम्ही गरीबांना मारहाण करता. तिथे मुकेश अंबानी आहेत. मराठी कमी बोलतात हिमंत असेल तर तिकडे जा. माहिममध्ये सारे मुस्लिम आहेत, तिकडे जा,असे आवाहन निशिकांत दुबे यांनी केले.