शिवसेना शिंदे गटात सामील झालेल्या निलेश राणे यांनी आपल्या बंधू भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंना एक सल्ला दिला आहे. आगामी निवडणुकांमुळे अनेक नेते भाषणांमध्ये आक्रमक होताना दिसत आहेत. अशातच नितेश राणे यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री राज्यात बसला आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यामुळे कोणी कितीही ताकद दाखवली किंवा कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. या वक्तव्यानंतर नितेश राणेंचं मोठे बंधू निलेश राणे यांनी बंधू नितेश राणेंना एक्सवर ट्विट करत एक सल्ला दिला आहे.
नितेश ने जपून बोलावे. मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. असा सल्ला निलेश राणेंनी नितेश राणेंना दिला आहे. तर यावर नितेश राणे यांनी निलेशजी तुम्ही tax free आहात असं मिश्किल उत्तर निलेश राणेंना एक्सवर ट्विट करत दिलं आहे.