नितीन गडकरी यांनी FASTag संदर्भात केली मोठी घोषणा

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी FASTag संदर्भात एक नवीन घोषणा केलीय. आता FASTag शी जोडलेला एक नवीन वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. हा वार्षिक पास राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी असून १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल.

टोल प्लाझावरील त्रास कमी करणे हा या वार्षिक पासचा उद्देश आहे. विशेषतः टोल प्लाझापासून ६० किमीच्या आत राहणाऱ्यांना याचा फायदा होईल. अनेकदा टोल प्लाझाच्या जवळपास राहणाऱ्या लोकांनाही टोल भरावा लागतो. पण या पासमुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. आता जे लोक विशिष्ट टोल प्लाझावरून वारंवार जातात त्यांना पत्ता पुरावा आणि आवश्यक कागदपत्रे जमा करून मासिक पास मिळू शकतो.

या पासमुळे टोल प्लाझावरील गर्दी कमी होईल. टोलवरून होणारे भांडणही कमी होतील. खासगी वाहने महामार्गावर जलद धावू शकतील. सरकारला सर्वकाही डिजिटल करायचे आहे. यामुळे लोकांची सोय होणार आहे. यासोबत रस्तेही आधुनिक होणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग ग्रिडवरील वाहनचालकांच्या सोयीसाठी पास आणला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here