‘5 महिन्यात मतदारांची लाट?’ राहुल गांधींचा सवाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा जसा निकाल लागला तेव्हापासून विरोधकांनी अनेक आरोप करायला सुरुवात केली. ईव्हीएम घोटाळा, मतदारांची संख्या यावर आरोप केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यासंबंधी लोकसभेत किंवा जाहीर सभांमध्ये आरोप केला आहे. त्याच मुद्यावरून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप केला. एकामागोमाग एक आकडेवारी सादर करत त्यांनी प्रश्नांची सरबत्तीच केली.

राहुल गांधींचे सवाल

महाराष्ट्रात विधानसभेत 2019 आणि लोकसभा 2024 मध्ये 32 लाख मतदार मतदार ॲड झाले. म्हणजे पाच वर्षात 34 लाख मतदार वाढले. पाच वर्षाच्या तुलनेत पाच महिन्यात एवढे मतदार कसे वाढले. हो लोक कोण आहेत? असा सवाल त्यांनी विचारला.
या निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील लोकसंख्ये एवढे मतदार वाढले. पाच वर्षात जेवढे मतदार मतदार यादीत ॲड केले होते. त्यापेक्षा जास्त मतदार महाराष्ट्रात पाच महिन्यात अॅड झाले. 32 लाख मतदार 2019 ते 2024 दरम्यान ॲड झाले. विधानसभेत 39 लाख मतदार ॲड झाले. हे लोक कोण आहेत? कुठून आले, असे अनेक सवाल उपस्थित करत राहुल गांधींनी हल्ला चढवला.

ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली ते दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाजातील आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला विचारलं. पण त्यांनी आजतागायत काहीच उत्तर दिलेलं नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here