जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं दहशतवाद्यांनी निष्पापांवर बेछूट गोळीबार केला. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या याच पाकिस्तानला हल्ल्याची परतफेड करत भारतानंही जशास तसं उत्तर दिलं. भारतीय लष्करातील तिन्ही दलांसह प्रामुख्यानं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उध्वस्त केले.
९ दहशतवादी तळांवर हल्ला करत भारतीय सैन्याच्या या हल्ल्यामध्ये पाकमध्ये लपून बसलेल्या तब्बल ९० हून अधिक दहशकवाद्यांचा खात्मा केल्याचं वृत्त यानंतर समोर आलं. ‘ऑपरेशन सिंदूर’वर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी जातीनं लक्ष घातलं.
६ मे २०२५ ची मध्यराच्र उलटून गेल्यानंतर आणि ७, मे २०२५ या नव्या दिवसाची सुरुवात होताच मध्यरात्री १.२८ वाजता पाकिस्तानात भारतीय सैन्यानं कारवाई सुरू करत १.५१ वाजता ही मोहिम फत्ते केली. २३ मिनिटांतच पाकिस्तानचा खेळ खल्लास झाला.