दहशतवाद्यांना घरात घुसून मारण्याची गरज : ओवैसी

ओवैसी यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर ओवेसींनी, “आता दहशतवाद्यांना घरात घुसून मारण्याची गरज आहे,” असं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. “हा काही राजकारणाचा मुद्दा नाही. हा आता आमच्या देशाचा, आमच्या जनतेचा आणि राष्ट्रहिताचा मुद्दा झाला आहे,” असं म्हणत ओवैसींनी या मुद्द्यावरुन राजकारण न करता कारवाई करणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय. “सरकार या प्रकरणात जी काही कारवाई करेल त्यामध्ये आम्ही सरकारसोबत उभे राहू,” असंही ओवैसींनी स्पष्ट केलं आहे.

गुरुवारी आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ओवैसींनी, “उद्या जेव्हा तुम्ही नमाज-ए-जुम्मा अदा करायला जाल तेव्हा हातावर काळी पट्टी बांधून जा,” असं आवाहन केलेलं. या काळ्या पट्टीच्या माध्यमातून आपण परदेशी शक्तींना भारताची शांतता आणि एकता कमकुवत करू देणार नाही असा संदेश देऊ. या हल्ल्यामुळे दुष्टांना आपल्या काश्मिरी बांधवांना लक्ष्य करण्याची संधी मिळाली आहे. शत्रूच्या जाळ्यात अडकू नका असे आवाहन मी मी सर्व भारतीयांना करतो असं ओवैसी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here