पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावाचे आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत पुढील २४ ते ३६ तासांत आपल्याविरोधात लष्करी कारवाई करणार असल्याची विश्वासार्ह माहिती आपल्याकडे असल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. मध्यरात्री २ वाजता बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी जर भारतीय सैन्याने कारवाई सुरू केली तर विनाशकारी परिणाम होतील असा इशारा दिला आहे.
“आमच्याकडे विश्वासार्ह गुप्तचर माहिती आहे की, भारत पुढील 24 ते 36 तासांत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करण्याची योजना आखत आहे. भारताच्या कोणत्याही कृतीला पूर्ण ताकदीने उत्तर दिलं जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.