पाकिस्तान आशिया कप मधून बाहेर जाणार, सुनील गावसकर यांचा दावा

आता पहलगाम हल्ल्याचा बदला बीसीसीआय सुद्धा घेऊ शकते. 2025 च्या सप्टेंबर महिन्यात टी 20 फॉरमॅटमध्ये एशिया कप खेळवला जाणार आहे. याचं यजमानपद हे भारत आणि श्रीलंकेकडे असणार असून या स्पर्धेतून बीसीसीआय पाकिस्तानला बाहेर काढू शकते असा दावा सुनील गावसकर यांनी केला आहे.

सुनील गावसकर यांचं म्हणणं आहे की, ‘पहलगाम हल्ल्यानंतर आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. अशातच आता पाकिस्तानचा आशिया कपमध्ये सहभाग जवळपास अशक्यच मानला जात आहे. बीसीसीआय नेहमीच भारत सरकारच्या आदेशाला मानत आली आहे. अशातच आशिया कपच्या आयोजनाबाबत सुद्धा असंच काहीसं पाहायला मिळू शकतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here