तुमच्या मृत्यूला फक्त दोन तास शिल्लक…पाकिस्तानी अभिनेत्रीचं जावेद अख्तर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालेला असताना जावेद अख्तर यांनी शांत राहावं असा सल्ला पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारीने दिला आहे. एका व्हिडिओमध्ये, तिने जावेद अख्तर यांना या विषयावर भाष्य करणं टाळावं आणि नसीरुद्दीन शाह यांचे अनुकरण करावं असे म्हटले आहे. इतकंच नाही तर तुमचा एक पाय स्मशानात आहे असं आक्षेपार्ह विधानही तिने केलं आहे. याआधी जावेद अख्तर यांनी भारतीय प्रशासनाकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी आणि कट रचणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचं आवाहन केलं होतं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत बुशरा म्हणते आहे की, “आपले जे लेखक आहेत, त्यांना बोलायला फक्त कारण हवं होतं. खरं तर त्यांनी मुंबईत भाड्याने घरदेखील मिळत नाही. आपलं अस्तित्व सिद्ध कऱण्यासाठी ते हवं तितकं बोलू शकतात. माहिती नाही काय काय बोलत आहेत. काहीतरी लाज बाळगा. तुमच्या मृत्यूला फक्त दोन तास शिल्लक राहिले आहेत. आणि तुम्ही इतक्या निरुपयोगी गोष्टी बोलत आहात. इतकं काय घाबरायचं आहे, इतकी हाव कशाला करता. आता तुम्ही शांत बसा. नसरुद्धीन शाहदेखील आहेत, ते शांत बसलेत ना? इतर लोकही शांत बसले आहेत ना? ज्याच्या मनात जे आहे ते ठेवूदेत. यांचं माहिती नाही, काय करत आहेत”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here