मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील घोडबंदर ते अच्छाड पर्यंतच्या बहुतांश हॉटेलांच्या पाट्या गुजराती भाषेत असल्यामुळे आता नवा वादंग उभा राहिला आहे महामार्गावरून पालघर जिल्ह्यात प्रवेश करताना गुजरातमध्ये आल्याचा भास होत आहे. या गुजराती पाट्यांविरोधात पालघर जिल्ह्याच्या कामगार आयुक्त कार्यालयाकडून कारवाई केली जात नसल्याचे चित्र इथे स्पष्ट होत आहे.
एकिकडे मराठी पाट्यांची सक्ती होत असतानाच या दुकानांकडे होणाऱ्या दुर्लक्षाविषयी प्रश्न विचारला असता.मनसेचे अविनाश जाधव यांनी’मी खात्रीनं सांगतो, राज ठाकरेंच्या भाषणामध्ये हे आलं होतं की पालघर ते मुंबई या परिसरामध्ये गुजरातमध्ये येणाऱ्या गाड्या, व्यापारी, दुकानदार यांनी सर्रास जागा खरेदी केल्या आहेत. जवळजवळ ते गुजरातमध्येच आहेत असं भासवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून मागील कैक वर्षांपासून होत आहे. आपल्याकडे कायदे आहेत, पाट्यांसाठीचे कायदे आहेत, दंड आहे मात्र अधिकारी याकडे का लक्ष देत नाहीत?’ असा उद्विग्न प्रश्न त्यांनी उपस्थित केला.