‘पंचायत’ या सीरिजने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केलं आहे. या सिरीजचे चारही सीजन प्रेक्षकांच्या फारच पसंतीला उतरले.आता ‘पंचायत’च्या आगामी म्हणजेच चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. ‘पंचायत ४’ येत्या २ जुलैपासून ‘प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर एक प्रमोशनल व्हिडीओद्वारे ‘पंचायत ४’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘पंचायत ४’च्या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये साहजिकच आनंदाचे वातावरण आहे.
‘पंचायत ३’च्या शेवटी प्रधानजी गोळी लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दिसतात. तर दुसरीकडे सचिवजी, विकास आणि प्रल्हादचा विधायक, भूषणबरोबर जोरदार राडा होतो. शेवटी सर्वजण पोलीस चौकीत खाली बसलेले दिसतात. त्यामुळे आता चौथ्या सीझनमध्ये कथानक कोणतं वळण घेणार?, प्रधानजी या हल्ल्यातून सुखरुप वाचतात का?, सचिवजी व रिंकीचं लग्न होईल का?, हे आगामी सीझनमध्ये दिसणार आहे.