पंतप्रधान मोदींनी शिवजयंती निमित्त मराठीत खास पोस्ट केली असून व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी या पोस्टमधून व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदींनी पोस्टसोबत एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासाठी काय आहेत, याबद्दल बोलत आहेत. आराध्य दैवतापेक्षा काही मोठं असू शकत नाही -पंतप्रधान मोदी”माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीये. हे फक्त राजा, महाराजा, राजपुरूष नाहीये. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आराध्य देव आहेत. आमच्यासाठी आराध्य देवापेक्षा मोठे काही असू शकत नाही”, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या आहेत. “छत्रपती शिवाजी महाराजाचं शौर्य, विचारधारा आणि न्याय प्रियतेने अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे. त्यांची धाडसी कार्यशैली, सामरिक कौशल्य आणि शांततापूर्ण राजकीय पद्धती आजही आपल्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत”, असेही मोदी म्हणाले आहेत.