तेज प्रताप यादव यांच्या धमकीवरुन ठूमके लगावल्यानंतर पोलिस शिपायाची बदली

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये होळीनिमित्त आयोजित केलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमात बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव हे एका पोलीस शिपायाला धमकी देऊन नाचायला भाग पाडताना दिसत आहेत. यानंतर आता आमदार तेज प्रताप यादव यांच्या अंगरक्षक पदावरून शिपाई दीपक कुमार यांना काढून टाकण्यात आले आहे.

रविवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात पाटणाच्या एसपी कार्यालयाकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. “सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये बिहार विधानसभेचे आमदार तेज प्रताप यादव हे अंगरक्षक (शिपाई) दीपक कुमार यांना नाचण्याची सूचना देत आहेत. सार्वजनिक ठिकाणी गणवेशात नाचत असल्याची माहिती मिळताच, शिपाई दीपक कुमार यांची पोलीस सेंटर येथे बदली करण्याचे आणि दुसर्‍या शिपायास अंगरक्षक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”

दरम्यान, या व्हायरल झालेल्या व्हिडीओत आमदार तेज प्रताप यादव म्हणाले की, “ये शिपाई, मी आता एक गाणे वाजवणार आहे. त्यावर तुला नाचावे (ठुमके) लागेल. नाही नाचलास तर तुला निलंबित करू” यानंतर तेज प्रताप यादव गाणं गातात आणि पोलीस शिपाई पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर त्यावर नाचतो. इतकेच नाही तर तेज प्रताप यादव “बुरा मत मानो, होली है” असेही म्हणताना ऐकू येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here