सततच्या छेडछाडीला कंटाळून पोलिस हवालदाराच्या मुलीची आत्महत्या

राज्याला हादरवून टाकणारा एक विचित्र प्रकार धाराशिवमधील तुळजापूरमध्ये घडला आहे. येथे सततच्या छेडछाडीला कंटाळून चक्क एका पोलीस हवालदाराच्या मुलीने आत्महत्या केली आहे. तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या मुलीची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव सारिका शिकारे असं आहे. सारिकाने तुळजापूर शहरामधील पोलीस क्वॉटर्स एस.टी. कॉलनी येथे राहत होती. धक्कादायक बाब म्हणजे सारिका केवळ १५ वर्षांची होती.

या प्रकरणी सारिकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ओंकार कांबळेबरोबरच नगिना शशिंकात पांडागळेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपी ओंकार कांबळेचा एक खळबळजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी ओंकार बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्याने आरोपी ओंकार कांबळेवर यापूर्वीही अशाच प्रकारे शस्र हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here