देश मोठ्या सेक्स स्कँडलने हादरला आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवावरच सेक्स स्कँडलचा आरोप करण्यात आला आहे. प्रज्वल रेवन्ना याचे 2000 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. जनता दल सेक्युलरचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर त्यांच्या घरात काम करणा-या मोलकरणीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला असून प्रज्वल रेवन्ना या प्रकरणात दोषी आढळले आहेत.
जेडीएसमधून हकालपट्टी केलेले माजी जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालय शनिवारी शिक्षा सुनावणार आहे. 2024 मध्ये दाखल झालेल्या चार गुन्हेगारी प्रकरणांमध्ये प्रज्वल रेवण्णा हा मुख्य आरोपी आहे.