अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूड अॅक्शन चित्रपट ‘हेड्स ऑफ स्टेट’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने एमआय 16 एजंटची भूमिका निभावली आहे. यानिमित्ताने चित्रपटाच्या लंडन प्रिमिअरदरम्यान तिने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा उल्लेख करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
एका मुलाखतीत प्रियांका चोप्राने स्टंट डबल्सचा वापर न करता अॅक्शन सीन करणाऱ्या अभिनेत्यांच्या कौशल्याचं कौतुक केलं. ती म्हणाली की “टॉम क्रूझ, अक्षय कुमार जे काही करतात ते मला फार आवडतं. ते जे करतात त्यात उत्तम आहेत”. दरम्यान यावेळी तिने आपल्याला मात्र हे सीन स्वत:हून करताना फार संकोच करते असं सांगितलं. “मला वाटत नाही की माझ्याकडे टेक ऑफ करणाऱ्या विमानाला लटकण्याची किंवा अशा गोष्टी करण्याची हिंमत आहे,” अशी कबुली तिने दिली.