काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतंच काँग्रेस पक्षाकडून झालेल्या चुका स्वीकारल्या आहेत. १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी तणावग्रस्त परिस्थितीमध्ये एक पक्ष म्हणून काँग्रेसनं काही चुकीच्या भूमिका घेतल्या.
अर्थात त्या वेळी आपण पक्षाचा भाग नव्हतो. मात्र त्या चुकांची जबाबदारी मात्र आपण स्वीकारतो असं त्यांनी सांगितलं. १९८० च्या दशकात जे काही घडलं ते चुकीचंच होतं असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.
अमेरिकेतील ब्राउन विश्वविद्यालयातील ‘वॉटसन इंस्टीट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स’मध्ये आयोजित एका संवादसत्रादरम्यान त्यांनी ही वक्तव्य केली.