महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 3 महिने झाले पण विरोधकांना पराभवाचा धक्का काही सहन झालेला नाही. एक एक दिवस त्यांना सत्तेपासून दूर बसणं आता अवघड होत चाललंय. या पराभवामुळे महाविकास आघाडीकडून सातत्याने निवडणुकीविषयीच शंका घेतली जाऊ लागली. सत्तेची हाव यांना काही शांत बसू देत नाहीये त्यामुळे हा रडीचा डाव हे खेळताय. कधी ईव्हीएमवर आरोप कर तर कधी निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे कर असा प्रकार रोजच्या रोज होऊ लागला. आता राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत नव्याने काही प्रश्न उपस्थित केले. सोबत संजय राऊत आणि सुप्रिया सुळेही होत्या. महाराष्ट्राची लोकसंख्या ९ कोटी ५४ लाख. मग मतदार त्यापेक्षा अधिक कसे वाढले? निवडणुकीपूर्वी एवढे मतदार कसे आले? पाच महिन्यात सात लाखापेक्षा अधिक मतदार आले. विधानसभेत ३९ लाख नवीन मतदार आले कसे?” असे अनेक सवाल राहुल गांधींनी उपस्थित केले.
राहुल गांधी यांनी हे प्रश्न उपस्थित केले असले तरी त्याची उत्तरे आधीच निवडणूक आयोगाने दिलेली आहे. पण यांना दुसरे मुद्दे नसल्याने हा आकड्यांचा खेळ मांडला आहे. त्याविषयीचा हा खास व्हिडिओ पहा.