रेल्वेने कन्फर्म तिकिटांसाठी काढला नवा नियम, वाचा नेमका काय?

गेल्या काही दिवसांपूर्वी आयआरसीटीसीकडून तात्काळ तिकीट बुक करण्याच्या नियमांत करण्यात आलेल्या बदलानंतर भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टच्या तिकिटांबाबत मोठा बदल केला आहे. आता रेल्वेकडून प्रत्येक ट्रेनच्या कॅटरगी (AC1,2, आणि 3 स्लीपर आणि चेअर कार) मध्ये एकूण सीटमध्ये फक्त २५ टक्केपर्यंतच वेटिंग तिकीट जारी केले जातील. वेटिंग तिकीट जारी केल्यानंतर दिव्यांगांचा कोटा आणि वेगवेगळ्या कॅटगरीमधील सीट या कोट्यामध्ये असणार. रेल्वेचे हे पाऊल म्हणजे प्रवाशाना कन्फर्म तिकिट मिळावे आणि अनिश्चितता दूर व्हावी यासाठी आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे २०%-२५% वेटिंग लिस्टमधील तिकिटे प्रवासापूर्वीच कन्फर्म होतात. रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकानंतर, सर्व झोनल रेल्वेने या नियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी, प्रतीक्षा यादीतील तिकिटांची संख्या जास्त असल्याने, बरेच प्रवासी आरक्षित डब्यांमध्ये चढत असत आणि त्यामुळं ट्रेनला गर्दी असायची. यामुळे कन्फर्म तिकिटांवर प्रवास करणाऱ्यांना अडचणी येत होत्या.

तिकीट बुक केल्यानंतर लोकांना येणारी अनिश्चितता कमी करण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here