हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा जीआर रद्द झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यां बंधूनी विजयी मेळावा वरळी डोम येथे आयोजित केला. या विजयी सभेत ठाकरे बंधू यांनी एकमेकांना तब्बल २० वर्षांनी मिठी मारल्याचं चित्र उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळालं. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती. अखेर हिंदी सक्तीच्या मुद्यावरुन तो क्षण पाहायला मिळाला.
सुमारे दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर आले आहेत. यामुळे राज्यातील वातावरण चांगंलच तापलं आहे. हा क्षण अतिशय अनोखा अन् खास होता. ‘आवाज मराठीचा’ असं ठसठसीत अक्षरात स्टेजवर लिहिलं आहे. या स्टेजवर दोघांनी एन्ट्री करताच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना मिठी मारली. एवढंच नव्हे तर दोघांनी हात वर करुन शक्ती प्रदर्शन दाखवलं आगे. स्टेजवर फक्त दोन खुर्च्या होत्या. ज्यावर दोन बंधू राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे विराजमान झाले.