रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का, पासपोर्ट…

रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने एक धक्का दिला आहे. रणवीर अलाहाबादियाने पासपोर्टची मागणी केली होती. मात्र, ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सध्या तरी रणवीर अलाहाबादियाला पासपोर्ट मिळणार नाही. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी आता दोन आठवड्यांनी होणार आहे.

गुवाहाटी, मुंबई आणि जयपूरमध्ये ‘इंडियाज गॉट लेटेंट’मधील वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणवीर अलाहाबादियाच्या विरुद्ध दाखल झालेल्या एफआयआरमध्ये अटकेपासून संरक्षण देण्याच्या अंतरिम आदेशाची मुदत न्यायालयाने वाढवली आहे. दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण होईल. दरम्यान, तोपर्यंत रणवीर अलाहाबादियाला पासपोर्ट देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला दोन आठवड्यांनी येण्यास सांगितलं. जर पासपोर्ट आता जारी करण्याचा आदेश दिला तर तपासावर परिणाम होऊ शकतो, असं कारण न्यायालयाने सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here