हिंदी म्युझिक इंडस्ट्रीतील लोकप्रिय रॅपर बादशाह पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावेळी त्याने सोशल मीडियावर केलेली एक मजेदार आणि धक्कादायक कमेंट केली आहे. ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असलेला बादशाहने यावेळी ब्रिटिश-पॉप गायिका दुआ लिपा बद्दल असं विधान केलंय की त्याचा अंदाजही लावू शकत नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर बादशाहने दुआ लिपा बद्दल आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
बादशाहने अलीकडेच दुआ लिपाचे नाव टाकत त्याच्यासमोर हार्ट इमोजी टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या. चाहत्यांनी लगेचच ही पोस्ट पकडली आणि प्रश्नांची लाट सुरू झाली. एका युजरने विचारले, ‘तू दुआ लिपासोबत काम करणार आहेस का?’ या प्रश्नाच्या उत्तरात बादशहाने हसतमुख पण धक्कादायक उत्तर दिले. ‘मला तिच्यासोबत मुले हवी आहेत.’ हे ऐकताच इंटरनेटवर मीम्स, कमेंट्स आणि चर्चांचा पूर आला. काहींनी ते मस्करी म्हणून घेतले तर काहींनी त्याला बादशाहच्या मनातील गोष्ट बाहेर आल्याचे म्हटले.