रॅपर हनुमानकाईंडचे पंतप्रधान मोदी यांनी केले कौतुक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात रॅपर हनुमानकाइंड याचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वीच या रॅपरने त्याचे गाणे ‘रन इट अप’ प्रदर्शित केले आहे आणि हे गाणे जगभरात ऐकले जात आहे. या गाण्याच्या माध्यमातून हनुमानकाइंडने जागतिक स्तरावर भारताची समृद्ध संस्कृती आणि परंपरा दाखवून दिल्याबद्दल मोदींनी त्याचे कौतुक केले आहे.

हनुमानकाइंड त्याच्या या गाण्यात पारंपारिक भारतीय मार्शल आर्ट्स जसे की कलारीपयट्टू, गटका आणि थांग-ता यासारख्या दाखवले आहेत. त्याच्या या प्रयत्नांची नरेंद्र मोदी यांनी त्यांचा दर महिन्याला होणारा रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या १२० व्या भागात दखल घेतली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी हनुमानकाइंडचे अभिनंदन करत कौतुक केले आहे. त्याच्या प्रयत्नांमुळे जगभरातील लोकांना भारताच्या पारंपारिक मार्शल आर्ट्सबद्दल जाणून घेण्यास मदत झाल्याचेही पंतप्रधान म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here